ब्रम्हनगरी गोंदवले आणि श्रीं चा अनुग्रह २
*अनुग्रहाची नोंदणी करून घे..* लगेच कार्यलयाकडे धाव घेतली आत गेल्यावर तीन विभाग होते *१.अनुग्रह आणि रूद्राभिषेक २. देणगी ३. पुस्तकालय*
• उद्या मिळणार्या अनुग्रहासाठी मला उद्याच नोंदणी करता येणार होती म्हणुन मी पुस्तकालयाकडे वळलो ..पूरंदरे काकांनी सांगितल्याप्रमाणे नित्योपासनाचे पुस्तक घेतले जेणे करून मला मंदिरात होणार्या काकड आरती पासून प्रत्येक पद , साधना व्यवस्थित कळाव्यात. जवळजवळ १०.३० वाजले होते , तसे गोंदवल्यात येण्यापुर्वी मी श्री महाराजांचे चरित्र आणि गोंदवल्याबद्दल बरीच माहिती पुस्तकांत मार्फत , लेख , युट्यूबवरील श्री महाराजां विषयीचे विडिओज पाहिले होते.
• गोंदवल्यात येण्यापुर्वीच मी मनाशी ठरवल होत की आपल्याला जमेल तेवढ अनवाणी चालायच जेणे करून थोडासा शारीरीक तप होईल. आता मोर्चा वळवला तो गोंदवल्यातील *गाव मारूती मंदिराकडे* हाच तो मारूती इतिहासाची साक्ष देत आजही गोंदवल्यात उभा आहे . गावकर्यांना विचारत मंदिराजवळ आलो योगायोगाने आज शनिवारच होता. याच मारूतीराया समोर श्री महाराज प्रार्थना करून गुरु शोर्धात निगाले होते आणि परतल्यावर महाराजांचा पहिला मुक्काम याच मंदिरात झाला. *महाराज म्हणजे साक्षात मारूतीच*
• मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठ । वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ।।
साष्टांग नमस्कार केला आणि पुढील १० मिनीटे तिथेच बसलो श्रीराम जयराम जयजय राम मंत्र सतत पुटपुटत होतो. मंदिराच्या मागच्या बाजूलाच माणगंगा वाहते ..." *अहो माणगंगा तीरि ! अवतरले श्री हरि ! पापी जनाते उद्धरिति* ! *ऐसे पावन गुरुराया !!*
या नदीच्या तिरावर श्री महाराज नामसाधनेसाठी जायचे , या नदीच्यापलीकडे *श्री भिमाशंकर* *महादेवाच* मंदिर आहे बाल वयात असताना महाराज तासनतास त्या महादेवासमोर तपर्शयेला बसायचे .., मारूती मंदिरातील गुरूजींना विचारून आम्ही महादेवाच्या मंदिराकडे निगालो. दूपार झाली होती आणि अनवाणी चालत होतो छोटेमोटे दगड लागत होते पण आतातर चटके लागायला लागले , माणगंगेच्या जून्या पूलावर पोहचलो नदीच पाणी संपूर्ण आठल होत पलिकडे थोड्या अंतरावर एक भगवा झेंडा दिसत होता बहूतेक तेच महादेवाच मंदिर असाव म्हणून मंदिराच्या दिशेने अक्षरशा धावत सुटलो कारण पाय चांगलेच भाजुन निगत होते...धावता धावता मनात चटकन विचार आला थोड्याशा अनवाणी चालण्याने पाय येवढे भाजता आहेत मग नर्मदा मैयाची परिक्रमा करणार्या परिक्रमावासिंचा तप किती मोठा असेल. आता योगायोग बघा हे लिहिताना पण मी मैयाच्या कुशीतच बसलोय ( भेडाघाट ) जबलपूर ।। *नर्मदे हर* ।। धावतच मंदिरात पोहचलो बाहेर येवढे उष्ण जाणवत होत पण मंदिरात पोहचल्यावर मात्र थंड वातावरण नंदी देवाला नमस्कार करून घंटा वाजवली आणि आत गाभार्यात प्रवेश केला ... *ॐ मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शम्भवे , अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः* प्रार्थना केली आणि तिथेच मांडी घालुन बसलो कारण वातावरण खूप शांत आणि थंड होत ..बसल्यावर झोप लागली की समाधी लागली काही कळाल नाही पण २० ते २५ मिनिटे आतच बसून होतो. जाग आली समोर महादेवाची पिंडी नमस्कार करून गाभार्याच्या बाहेर आलो . मंदिराच्या एका बाजूला पाण्याची टाकी बसवली होती थोडस पाणी प्यालो आणि फ्रेश झालो ., हे मंदिर प्राचीन असून माणगंगेने वेढलेल आहे . थोडा वेळ बसून परत गावाकडे निगालो ते श्री विठ्ठल रूक्मिणीच्या मंदिराजवळ ...
*To be continued* ....
*शेखर नामदेव देसाई. [ मुंबई ]*

Comments
Post a Comment