ब्रम्हनगरी गोंदवले आणि श्रीं चा अनुग्रह १
*श्री ब्रम्हचैतन्यार्पणमस्तु*
मनात ठरवल्या प्रमाणे पहाटे वेळेवर गाडी गोंदवल्याला पोहचली ., काही वर्षांंच स्वप्न सत्यात उतरल होत. वाटसरुना विचारत मंदिराचे कार्यालय कुठे आहे येऊन पोहोचलो.
तीन वयस्कर माणसे बसली होती मि विचारले काका राहण्यासाठी रूम हवी होती .! हो मिळेल किती जण आपण कुठून आलात?...रामनवमी असल्यामुळे स्वतंत्र रूम फैमिली साठी राखिव ठेवल्या आहेत , तूम्ही मूल आहात हाॅल मधे सोय होईल..पुढे नोंदणी करून *श्री ब्रम्हानंद हाॅल* आम्हाला मिळाला ..हाॅलमधे जाऊन फ्रेश झालो आणि लगेच समाधी मंदिराजवळ आलो , आईसाहेबांच दर्शन घेतल आणि आम्हाला लोण्यांचा प्रसाद मिळाला बहूतेक श्रीमहाराजांची काकड आरती संपली होती , प्रसादामुळे छान चव आली जिभेवर तोच कुठुनतरी अभंग कानावर ऐकायला आला..
*देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधिलिया ॥ हरि मुखें ह्मणा हरि मुखें ह्मणा । पुण्याची गणना कोण करीं ||*
मन प्रसन्न झाल आणि दर्शनाची उक्तंठा अजूनच वाढली आतापर्यंत फोटोज , विडिओ मधे श्रीमहाराजांची समाधी पाहिली होती आतातर प्रत्यक्ष समाधी दर्शन होणार होते ..सकाळ अल्यामुळे गर्दी कमी होती , समाधी मंदिरात प्रवेश केला काहिजण नामसाधनेला बसली होती. प्रथम दर्शन झाले ते श्री तुकामाईंचे *धन्य ते गुरु शिष्य प्रेम* मध्यभागी भगवान श्री क्रृष्णांची गोंडस मुर्ती पाहून मनात श्लोक उमटला *सच्चिदानंद रूपाय, विश्व उत्पत्ति हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः ||* भगवंताची प्रार्थना करून सर्मथांच्या दिव्य अशा फोटो जवळ आलो सर्मथांच तेज जाणवत होत ... *सदा सर्वदा योग तूझा घडावा |. तुझे कारणी देह माझा पडावा | उपेक्षू नको गूणवंता अनंता |. रघूनायका मागणे हेचि आतां || *जय जय रघुवीर समर्थ ।।* खाली पार्या उतरुन महाराज्यांच्या समाधी समोर उभा झालो अंतकरणातून स्वर उमटले... *जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, तयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती , नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती.* ..आजचा दिवस भाग्याचा होता आणि उद्या माझ्यासाठी भाग्योदयच होणार होत कारण साक्षात *श्री महाराजांचा अनुग्रह मला प्राप्त होणार होता* ते हि रामनवमी च्या पवित्र अशा दिवशी...खूप प्रसन्न वाटत होत आतापर्यंत ऐक प्रचीती आली होती लेखांमधून , लोकांकडून ऐकले होते गोंदवल्यात गेल्यावर रामनाम मुखात खेळू लागत. पण ते मला जाणवू लागल होत श्रीराम जयराम जयजय राम सतत मंत्र जपत होतो ..
• रात्रभरच्या प्रवासामुळे थोडासा थकवा जाणवत होता म्हणून जरा विश्रांतीसाठी परत हाॅल मधे गेलो .. थोड्यावेळाने फ्रेश होऊन ब्रेकफास्ट केला.. आणि आता परत समाधी मंदिराजवळ आलो तिथे मी श्री अशोक गुरूजी आणि श्री सुधीर गुरुजींना शोधत होतो कारण श्री महाराजां कडून तेच मला अनुग्रह देणार होते . श्री पूरंदरे काकांनी सांगितल्या प्रमाणे त्यांचा शोध घेत होतो.. काकांबद्दल सांगायचे राहिले *श्री अजय पूरंदरे* काका राहणार मुंबई प्रत्यक्षरित्या काकांची अजून भेट झाली नाही पण फेसबुक , वाॅटसॅप मुळे संर्पकात आहे वेळोवेळी त्यांचे अमूल्य असे मार्गदर्शन मिळत असते... श्री महाराजांनी मला गोंदवल्यात आणण्याचे कार्य जणू काहि काकांकडेच सोपवले होते...काकांचा मी खूप त्रृणी आहे
• समाधी मंदिराजवळच श्री सुधीर गुरुजींची भेट झाली नमस्कार करुन मी म्हणालो मला अनुग्रह घ्यायचा आहे गुरुजींनी थोडी चौकशी करुन सांगितले उद्या सकाळी साडेनऊ वाजता समाधी मंदिरात येऊन भेट आणी कार्यालयात जाऊन अनुग्रहाची नोंदणी करून घे...
*To be continued*...
*शेखर नामदेव देसाई. [ मुंबई ]*

Comments
Post a Comment