Posts

Showing posts from June, 2019

ब्रम्हनगरी गोंदवले आणि श्रीं चा अनुग्रह २

*अनुग्रहाची नोंदणी करून घे..* लगेच कार्यलयाकडे धाव घेतली आत गेल्यावर  तीन विभाग होते *१.अनुग्रह आणि रूद्राभिषेक २. देणगी ३. पुस्तकालय*  • उद्या मिळणार्या अनुग्रहासाठी मला उद्याच नोंदणी करता येणार होती म्हणुन मी पुस्तकालयाकडे वळलो ..पूरंदरे काकांनी सांगितल्याप्रमाणे नित्योपासनाचे पुस्तक घेतले जेणे करून मला मंदिरात होणार्या काकड आरती पासून प्रत्येक पद , साधना व्यवस्थित कळाव्यात. जवळजवळ १०.३० वाजले होते , तसे गोंदवल्यात येण्यापुर्वी मी श्री महाराजांचे चरित्र आणि गोंदवल्याबद्दल बरीच माहिती पुस्तकांत मार्फत , लेख , युट्यूबवरील श्री महाराजां विषयीचे विडिओज पाहिले होते.  • गोंदवल्यात येण्यापुर्वीच मी मनाशी ठरवल होत की  आपल्याला जमेल तेवढ अनवाणी चालायच जेणे करून थोडासा शारीरीक तप होईल. आता मोर्चा वळवला तो गोंदवल्यातील *गाव मारूती मंदिराकडे* हाच तो मारूती इतिहासाची साक्ष देत आजही गोंदवल्यात उभा आहे . गावकर्यांना विचारत मंदिराजवळ आलो योगायोगाने आज शनिवारच होता. याच मारूतीराया समोर श्री महाराज प्रार्थना करून  गुरु शोर्धात निगाले होते आणि परतल्यावर महाराजांचा पहिला मुक्क...

ब्रम्हनगरी गोंदवले आणि श्रीं चा अनुग्रह १

 *श्री ब्रम्हचैतन्यार्पणमस्तु* मनात ठरवल्या प्रमाणे पहाटे वेळेवर गाडी गोंदवल्याला पोहचली ., काही वर्षांंच स्वप्न सत्यात उतरल होत. वाटसरुना विचारत मंदिराचे कार्यालय कुठे आहे येऊन पोहोचलो. तीन वयस्कर माणसे बसली होती मि विचारले काका राहण्यासाठी रूम हवी होती .! हो मिळेल किती जण आपण कुठून आलात?...रामनवमी असल्यामुळे स्वतंत्र रूम फैमिली साठी राखिव ठेवल्या आहेत , तूम्ही मूल आहात हाॅल मधे सोय होईल..पुढे नोंदणी करून *श्री ब्रम्हानंद हाॅल* आम्हाला मिळाला ..हाॅलमधे जाऊन फ्रेश झालो आणि लगेच समाधी मंदिराजवळ आलो , आईसाहेबांच दर्शन घेतल आणि आम्हाला लोण्यांचा प्रसाद मिळाला बहूतेक श्रीमहाराजांची काकड आरती संपली होती , प्रसादामुळे छान चव आली जिभेवर तोच कुठुनतरी अभंग कानावर  ऐकायला आला..  *देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधिलिया ॥ हरि मुखें ह्मणा हरि मुखें ह्मणा । पुण्याची गणना कोण करीं ||*  मन प्रसन्न झाल आणि दर्शनाची उक्तंठा अजूनच वाढली आतापर्यंत फोटोज , विडिओ मधे श्रीमहाराजांची समाधी पाहिली होती आतातर प्रत्यक्ष समाधी दर्शन होणार होते ..सकाळ अल्यामुळे गर्दी कमी ...