ब्रम्हनगरी गोंदवले आणि श्रीं चा अनुग्रह २
*अनुग्रहाची नोंदणी करून घे..* लगेच कार्यलयाकडे धाव घेतली आत गेल्यावर तीन विभाग होते *१.अनुग्रह आणि रूद्राभिषेक २. देणगी ३. पुस्तकालय* • उद्या मिळणार्या अनुग्रहासाठी मला उद्याच नोंदणी करता येणार होती म्हणुन मी पुस्तकालयाकडे वळलो ..पूरंदरे काकांनी सांगितल्याप्रमाणे नित्योपासनाचे पुस्तक घेतले जेणे करून मला मंदिरात होणार्या काकड आरती पासून प्रत्येक पद , साधना व्यवस्थित कळाव्यात. जवळजवळ १०.३० वाजले होते , तसे गोंदवल्यात येण्यापुर्वी मी श्री महाराजांचे चरित्र आणि गोंदवल्याबद्दल बरीच माहिती पुस्तकांत मार्फत , लेख , युट्यूबवरील श्री महाराजां विषयीचे विडिओज पाहिले होते. • गोंदवल्यात येण्यापुर्वीच मी मनाशी ठरवल होत की आपल्याला जमेल तेवढ अनवाणी चालायच जेणे करून थोडासा शारीरीक तप होईल. आता मोर्चा वळवला तो गोंदवल्यातील *गाव मारूती मंदिराकडे* हाच तो मारूती इतिहासाची साक्ष देत आजही गोंदवल्यात उभा आहे . गावकर्यांना विचारत मंदिराजवळ आलो योगायोगाने आज शनिवारच होता. याच मारूतीराया समोर श्री महाराज प्रार्थना करून गुरु शोर्धात निगाले होते आणि परतल्यावर महाराजांचा पहिला मुक्क...